एक वर्ष कोल्हा'पूर' सेवा कार्याला...


मागल्या वर्षी याच काळात कोल्हापूर,सांगली ला महापुराची परीस्थिती उद्भवली होती त्यावेळी ती सर्व परीस्थिती बघुन मनाला एक चटका लागला आणि वारंवार एक मनात वाटत होत कि आपण काही तरी करावं. याच वेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद मध्ये काम करत असतांना आमच्या संघटनमंत्री सहज प्रवासावर असतांना बोलता बोलता चर्चा सुरु होती आणि ते बोलले कि अभाविप तर्फे कोल्हापूर आणि सांगली ला सेवा कार्य सुरु आहे आणि तीथे काही कार्यकर्त्यांची आवश्यकता आहे अस कळल आहे आणि विदर्भातुन काही कार्यकर्त्यांना तीथे पाठवायचा विचार सुरु आहे.त्याच क्षणी मी त्यांना म्हटल कि मी जायला तयार आहे,मला जायच आहे तुम्ही माझ नाव सांगुन द्या.तर आधी ते मला म्हणाले कि सध्या काही नक्की नाही.आणि एक मला आनंद झाला अाणि मनातून बरं वाटलं कि ज्या वेळी मी माझ्या घरी तीथे जायला परवानगी साठी विचारलं त्या वेळी मला घरुन सुद्धा हो म्हटल आणि घरी सर्वांना आनंद होता कि आपण नाही तरी आपल्या घरुन कोणीतरी तिथे लोकांची सेवा करायला चालला आहे.
                  विदर्भ प्रांतातून काही कार्यकर्त्यांना कोल्हापूर आणि सांगली ला पाठवायच ठरल आणि माझ तीथे जाणार्‍या पहिल्या टोळीत नाव आलं.आम्ही अमरावतीला तीथल्या लोकांसाठी मदत गोळा करायला सुरुवात केली.काही लोकांनी धान्य दिलं,काहींनी कपडे दिले,काहींनी जीवन आवश्यक वस्तू दिल्या,काहींनी वह्या-पुस्तके दिले,काहींनी आर्थीक स्वरुपात मदत केली व भरपुर प्रमाणात बर्‍याच वस्तू गोळा झाल्या.आणि अस सांगीतल्या गेलं कि १५ अॉगस्ट ला आम्हाला इथून कोल्हापूर ला निघायचं आहे.इतक्या लवकर रेल्वेच आरक्षण मीळनं सुद्धा कठीन होत परंतू कसही जावं लागल तरी चालेल पण जायच आहे हाच विचार करुन आम्ही अभाविप कार्यालयात ध्वजारोहण केलं व मागल्या वर्षी १५ अॉगस्ट लाच रक्षाबंधन सुद्धा असल्या मुळे परिषदेतील ताईंनी आम्हाला रक्षासुत्र बांधले व आम्ही अमरावती हून तीन कार्यकर्ते निघालो त्यात एक डॉक्टर कर्यकर्ता सुद्धा सोबत होता.आम्ही अमरावती ते कोल्हापूर ट्रेन ने जनरल डब्यात सर्व मदतीच सामान घेऊन जायचे ठरवले. अमरावती हून आम्ही तीन कार्यकर्ते,अकोल्याहून दोन,वर्धेहून दोन व मलकापुर हून एक डॉक्टर अशी आमची पहिली तुकडी होती.सर्व लोक आपल्या आपल्या स्थानांवरनं एकाच ट्रेन ने जायला निघालो.सर्व बरोबर सुरु असतांना आम्हाला कळलं की सांगली येथील मीरज च्या पुढे रेल्वे रुळावर पाणी आल्यामुळे ट्रेन मीरज पर्यंतच जाईल.तरीही सुद्धा मनामध्ये एक जोश असल्यामुळे इतक तर नक्की करुन घेतल होतं कि काहीही झालं तरी चालेल परंतु आता इथुन मागे जायचं नाही.मग सकाळ होताच कळलं कि ट्रेन पुर्ण कोल्हापूर पर्यंत जाईल त्यावेळी थोड बर वाटलं आणि आम्ही कोल्हापूर ला पोहोचलो.जसं जसं ट्रेन सांगली आणि कोल्हापूर जवळ जात होती तसं तसं पुरा मुळे झालेलं नुकसान व काही गावांमध्ये त्यावेळी सुद्धा पुराचे पाणी मोठ्या प्रमाणात असल्याचे व मोठ्याप्रमाणात लोकांचे नुकसान  झाल्याचे दिसुन येत होते व मनाला दुखः होत होते.
                  कोल्हापूर ला पोहोचताच आम्हाला कळलं कि अभाविप कोल्हापूर च्या कार्यकर्त्यांनी आमची राहायची व्यवस्था ही छत्रपती शिवाजी विद्यापीठा मध्ये केली आहे तर आधी आम्ही तीथे गेलो.तीथे पोहोचताच आम्हाला पुढिल सात दिवसांमध्ये काय कार्य कश्या पद्धतीने कुठल्या भागांमध्ये करायच आहे त्याची माहीती देण्यात आली.आमच्या सोबत तीथे रत्नागीरी देवरुख,धुळे,नवी मुंबई या ठीकानांनवरनं आलेले कार्यकर्ते सुद्धा होते.सायंकाळी सर्व चर्चा करण्यात आली व प्रत्येकाला प्रत्येकाच काम वाटुन देण्यात आलं.त्यावेळी घडलेला एक प्रसंग मला नेहमी आठवतो आणि मनाला एक प्रेरणा देऊन जातो.सर्वांना आपली आपली काम वाटुन देनं सुरु असतांना कोल्हापूर येथील कार्यकर्ते सुद्धा आमच्या सोबत होते.त्यांनी सुद्धा काम वाटुन घेतले आणि ठरल कि सकाळी ६ वाजता शीये नावाच्या गावात जायचे आहे.त्यात आम्हाला सर्वांना एक प्रश्न होता कि इथे इतकी भीषन परीस्थिती आहे लोकांचे घर सुद्धा वाहून गेले अशा काळात तेथील स्थानीक कार्यकर्ते आपल्या सोबत कसे येतील,त्यांच्या घरी सध्या कशी परीस्थिती असेल असे अनेक प्रश्न मनात येत होते आणि अश्या काळात ते त्यांच्या घरचं सोडून आपल्या सोबत कसे येतील आणि लोकांना मदत करतील.तर मी सर्व लोक बसले असतांना तीथल्या एका कार्यकर्त्याला विचारल की तु कसा करशील हे तर त्यानी मला एक खुप हृदयाला स्पर्श करणार उत्तर दिलं,म्हणजे एखादा विद्यार्थी ज्या वेळी विद्यार्थी परिषदेच काम करतो आणि त्याच्यावर ज्यावेळी संघटनेचे संस्कार होतात त्यावेळी तो समाजातील प्रत्येक घटकाला आपला बंधू समजतो आणि प्रत्येकाच्या सुखः दुखाःत सहभागी होतो व संघटनेच्या कामाशी किती प्रामाणिक असतो सा सर्व गोष्टींची जाणीव मला त्यावेळी झाली.त्या कार्यकर्त्याने मला उत्तर दिलं कि मी मुळ इचलकरंजी चा आहे,आणि आता मी कोल्हापूर हून इचलकरंजी ला घरी जाऊन रात्रभर घरी जे काही नुकसान झाल आहे त्याची दुरुस्ती करेल आणि घरच्यांना सर्व कामांमध्ये मदत करेल आणि ते होताच परत पहाटे सर्व घरच काम करुन इथे परिषदे मार्फत सुरु असलेल्या सेवा कार्यासाठी तुमच्या सर्वांसोबत येईल आणि ज्यावेळी सकाळी ६ वाजता आम्ही सर्व जायला तयार झालो त्यावेळी तो आमच्या आधी दारावर जायला उभा होता.म्हणजे काय मानसीकता असावी एका कार्यकर्त्याची कि आपल्या घराच नुकसान झाल आहे परंतू आपल्या घरा सोबतच आपल्या परिवारासोबतच इतर सुद्धा लोकांच नुकसान झालं आहे ते आपलेच बंधु आहेत आणि त्यांना मदत करनं सुद्धा आपलं कर्तव्य आहे म्हणून थोडा सुद्धा आराम न करत पुर्ण काम अगदी सहजरित्या चेहर्यावर थोडा सुद्धा थकवा न जानवू देता तो कार्यकर्ता दररोज रात्री घरी जायचा व पहाटे सर्वे घरचे काम करुन परत कोल्हापूर ला यायचा आणि दिवसभर परिषदेच्या सुरु असलेल्या सेवा कर्यामध्ये लोकांची सेवा करायचा.
               बरेच लोकं राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर व अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेवर नेहमी टिका करतात,विरोध करतात परंतू संपुर्ण देशामध्ये कुठेही,कुठलीही आपत्ती आली तरी स्वताःचा कुठलाही विचार न करता स्वयंसेवक व कार्यकर्ते तीथे पीडीत लोकांची सेवा करायला सर्वांच्या आधी पोहोचतात या गोष्टिला कोणी नाकारु शकत नाही.संघ किंवा परिषद हे सर्व सेवा कार्य नावा साठी कधीच करत नाही किंवा स्वयंसेवकांना आणि कार्यकर्त्यांना स्वताःच्या जीवाचा सुद्धा विचार न करता ते करत असलेल्या कर्याचा पगार मीळत नसतो.स्वातंत्रवीर सावरकरांनी जस म्हटलं होतं कि "देहाकडून देवाकडे जातांना देश लागतो आणि या देशाचे आपण देणे लागतो" या भावनेतून प्रत्येक स्वयंसेवक व कार्यकर्ता काम करत असतो.मला अनंद आहे कि मी संघाचा एक स्वयंसेवक आहे आणि विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता आहे कारण ज्या वेळी सांगली आणि कोल्हापूर ला अशी परिस्थिती आली त्यावेळी सेवा कार्य सुरु करणारा सर्वात पहीले कुठले संघटन असेल तर ते रा.स्व.संघ व अभाविप होतं.आणि त्या हे सर्व कार्य किती मोठ्या प्रमाणात होत हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे.हळू-हळू बरेच लोक तीथे येऊ लागले आणि सेवा कार्य करु लागले परंतू जीतकी गरज लोकांना आर्थीक मदतीची,वस्तूंची,मनुष्यबळाची होती त्याहून आधीक गरज ही वैद्यकीय सेवेची होती.कारण पुर आल्यामुळे बरेच प्राणी वाहुन गेले होते आणी त्यांचा मृत्यू झाला होता ते तीथे तसेच होते त्यांचे सर्व जंतू पसरत होते व पाण्यामुळे विविध त्वचेचे रोग नागरीकांना होत होते,प्यायला शुद्ध पाणी नसल्याने रोग पसरत होते.अश्या परिस्थितीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने जिज्ञासा व मेडीव्हीजन या वैद्यकीय आयामा अंतर्गत सर्वात प्रथम तीथे वैद्यकीय सेवा द्यायला सुरुवात केली.
                  अभाविप तर्फे प्रत्येक गावात काही कार्यकर्ते गावाची स्वछता करायचे,वैदयकीय शिबिर लावण्यात यायचे,काही कार्यकर्ते गावातील नागरीकांच्या घरी जाऊन सर्वे करायचे की त्यांना सध्या  कशाची जास्त आवशकता आहे म्हणजे त्यांना तशा वस्तू पुरवल्या जाऊ शकतील.मी काही दिवस स्वछता करायच्या टोळीत काम केलं,काही दिवस सर्वे करायच्या टोळीत सुद्धा काम केलं व ज्यावेळी डॉक्टर्स सोबत फारमसीस्ट नसायचे त्यावेळी त्यांच्या सोबत त्यांनी सांगीतलेलं अौषध लोकांना द्यायच हे सुद्धा काम करन मी त्या वेळी तीथे अनुभवलं.सर्वे करतांना ज्या वेळी लोकांकडे त्यांच्याशी बोलायला जायचो आणि ते त्यांचे घर दाखवायचे त्या वेळी ती सर्व परिस्थिती बघुन दुखः व्हायचं.त्या लोकांना त्यांचे संसार,घर सर्व पुन्हा शुन्या पासून सुरु करायची गरज होती,घरात सध्या चमच्या पासून नवीन वस्तू घ्यायची गरज होती,घरात लहान मुलं असतांना कधी कुठली भिंत पडेल याची खात्री नव्हती,कुठुन साप,विंचू येईल काही सांगता येत नव्हत ,घरी विज नाही,पैश्यांचा कुठला स्त्रोत नाही,शेतात पेरलेलं सर्व वाया गेलं होत,पुढल्या पेरनी साठी सुद्धा जमीन चांगली नाही याची खात्री होती,आधी सर्वी कडे पाणीच पाणी होत परंतू सर्व पाणी दुषीत झाल्यामुळे प्यायला पाणी नाही,अश्या असंख्य समस्यांसोबत सुद्धा सर्व लोक एक जुटीने लढत होते अाणि त्यांच्या मनामध्ये एक विश्वास होता की या परिस्थितीवर सुद्धा मात करुन आपण पुन्हा एकदा नव्याने जगू शकू.
                 त्यावेळी सोशल मिडीयावर एका महिलेचा विडीअो खुप वायरल झाला होता.एक महिला एका सैनीकाला ते त्या लोकांना बोटेने सुरक्षीत जागी घेऊन जातांना सैनीकाचे पाय लागायची.ज्या वेळी आम्ही विवीध गावांमध्ये जायचो आणि बरेच लोकं आम्हाला विचारायचे की तुम्ही कुठले आहात,कुठुन आलात आणि आम्ही सर्व विद्यार्थी असल्या वयाने सुद्धा मोठे नव्हतो अश्या वेळी जेव्हा आम्ही त्यांना सांगायचो कि आम्ही अमरावती हून आलो आहे,विदर्भातून आलो आहे त्यावेळी त्या माय-माऊलींच्या डोळ्यातील अश्रू जीवनभर विसरु शकनार नाही.ज्या मायेनी ते आमच्याशी बोलायचे,वागायचे आम्हाला सहकार्य करायचे या सर्व गोष्टी कधीच विसरता येणार नाही.
                अभाविप ने तीथे लोकांना प्रत्येक गोष्टिंची मदत केली.म्हणजे अगदी दररोज पीण्याच्या शुद्ध पाण्या पासून तर घरोघरी जाऊन टिफीन पोहोचून द्यायच काम विद्यार्थी परिषदेने बराच काळ तीथे केल आहे.आम्ही शीये नावाच्या गावात सुद्धा गेलो होतो जीथे कुंभार  लोकांची वस्ती होती आणि तीथे त्या लोकांनी खुप मोठ्या प्रमाणात गणपती च्या मूर्ती बनवल्या होत्या आणि पुरस्थिती उद्भवल्या मुळे त्या सर्व मुर्ती खराब झाल्या काही वाहून गेल्या होत्या आणि थोड्याच चांगल्या स्थीती मध्ये होत्या.ज्या वेळी आम्ही तिथे गेलो आणि लोकांशी बोलतांना त्यांनी आम्हाला सांगीतल कि त्यांनी जस त्यांच्या मुलांना उंचावर नेलं त्याच प्रमाणे त्यांनी श्रद्धा म्हणून त्या मुर्ती सुद्धा उंचीच्या ठीकाणी नेल्या त्यावरुन आपल्याला आपली संस्कृती लक्षात येते कि सजीव असो वा निर्जीव असो त्याला हानी पोहोचता कामा नये.
                 ज्या वेळी जोकांना त्यांच्या गावातून रेसक्यू करण्याच कार्य सुरु होते त्या वेळी तेथील लोकांनी ज्या प्रमाणे स्वताःच्या मुलांना काळजीने लक्षपुर्वक बोट मध्ये आणायचे त्याच प्रकारे लोक आधी त्यांच्या प्राण्यांना सुद्धा तीतक्याच काळजीने बोटी पर्यंत आणून बसवायचे त्या नंतरच स्वताः बसायचे. या वरून अशा काळात सुद्धा आपल्याला आपल्या सभ्यता संस्कृती या सर्व घटनांमधन दिसुन येईल.
               सेवा कार्य करत असतांना अभिमान त्या वेळी वाटला कि मुलींना दुर्बल समजण्याची काही लोकांची प्रवृत्ती आहे,परंतू अभाविप च्या विद्यार्थीनी कार्यकर्त्यांनी वेळोवेळी समाजाला अबला नसून ती सबला आहे याची जाणीव करुन दिली आहे.त्याचच एक उदाहरण म्हणून सर्व सेवा कार्य सुरु असताना विद्यार्थी कार्यकर्त्यांसोबत विद्यार्थीनी कार्यकर्त्या सुद्धा विविध ठिकानांवरुन आल्या होत्या आणि स्थानीक विद्यार्थीनी सुद्धा सोबत होत्या व त्या सर्व तीतक्याच ताकदिनी मुलांसोबत काम करायच्या.त्यातून त्यांनी परत एकदा समाजाला जाणीव करुन दिली कि कुठलही संकट आलं तरी आम्ही सुद्धा या देशातील नागरीकांसाठी त्यांच्या सोबत उभ आहोत म्हणून.
          नियती नी काय परीस्थिती आणावी याच उदाहरण कि आम्ही खीद्रापुर नावाच्या गावी गेलो होतो.खीद्रापुर म्हणजे पुरामुळे सर्वात जास्त नुकसान झालेल्या गावांपैकी एक.हे गाव महाराष्ट्राच्या सीमेवर आहे व या गावाला तीन बाजूंनी नदी न विळखा घातला आहे.त्या गावी गेल्यावर अस लक्षात आल कि आधी पुरामुळे खुप पाणी परंतू सर्व नुकसान झाल्यामुळे पुराचं पाणी गेल्या नंतर ज्यावेळी त्या नागरीकांना स्वछता करायची होती त्या वेळी अशी परिस्थीती होती कि त्यांच्या कडे पाणी नव्हतं.नदीच पाणी आणायला रस्ता उरला नव्हता तर ते सुद्धा आणता येत नव्हत.अशी परिस्थिती लक्षात आल्यावर अभाविप च्या कर्यकर्त्यांनी तीथे नदी जवळ जाण्याचा रस्ता पुर्ण स्वच्छ केला व पुर्ण मोकळा केला आणी त्या नंतर नागरीक तीथून पाणी नेऊ शकले व घराची स्वछता करु शकले.त्या नंतर  पाण्याची सुद्धा भीषण अवस्था होती म्हणजे असं म्हणता येईल कि,संपुर्ण जागी पाणी होत पण प्यायच्या नळाला पाणी नव्हत.अशा स्थीतीत सुद्धा ते लोक जगले व त्यावर मात केली.
                  कोल्हापूर ला सेवा कार्य कारायला गेल्यावर बरेच अनुभव आले आणि त्यातून जीवन जगण्याचे बरेच मार्ग दिसले,लोकांची स्थीती जवळून जाणुन घेत त्यावर त्यांच निरासरन करता आलं याचा सुद्धा एक आनंद होता.परंतू या सोबतच तीथल्या स्थानीक कार्यकर्त्यांनी जे अशा काळात सुद्धा प्रत्येक गोष्टीच नियोजन केलं होत म्हणजे अगदी सर्वांच्या सुरक्षेसाठीचं असो किंवा भोजनाचं असो राहाचं असो त्यांनी कुठेच काहीच कमी जाणवू दिली नाही.एका गोष्टीचा आनंद हा सुद्धा आहे कि एक अतुट नात सर्वांशी जुळल आणि आता सुद्धा ते सर्व लोक चांगल्यानी संपर्कात आहे व आपल्या आपल्या स्थानांवर खुप चांगल्या पद्धतीने सर्व लोक काम करत आहेत.ज्या वेळी आम्ही कोल्हापूर वरुन परत अमरावतीला यायला निघालो आम्ही तीथून निघायच्या आधीच आमची दुसरी तुकडी तीथे आली होती.आम्ही तर तीथून निघालो परंतू तेच स्थानीक कार्यकर्ते आमच्या दुसर्‍या तूकडी सोबत त्याच जोमाने परत काम करत होते.या सर्व कार्यातून विद्यार्थी परिषदेनी परत एकदा समाजाला दाखवून दिलं कि "स्टूडेंट पावर ही न्युसेन्स पावर नसुन,स्टूडेंट पावर ही नेशन्स पावर आहे".
               आता देवाकडे एकच प्रार्थना आहे कि असं संकट कुठेच नको येऊ देऊ.कुणावर कधीच ही अशी पुरस्थीती नाही यावी.शासनाने याची काळजी घ्यावी व त्यावर योग्य ते निर्बंध करावे व नागरीकांनी सुद्धा शासनाला सहकार्य करावं.


चिन्मय किरण भागवत,
अमरावती
मो.बा.:- 9307385859